आरती संग्रह

गणपती

शिव शंकर

देवी

श्री दत्तगुरु

श्री विठ्ठल

श्री सत्यनारायणाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा । पंचारती ओवाळू  श्रीपती तुज भक्तिभावा ।।जय०।।

विधियुक्त पुजूनी करिती पुराण श्रवण । परिमळ द्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।

घृतयुक्त शर्करामिश्रित गोधमचूर्ण । प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ।।जय०।।

शतानंदविप्रे पूर्वी व्रत हे आचरिले । दरिद्र दवडूनि अंती त्याते मोक्षपदा नेलें ।

त्यापासून हें व्रत या कलियुगी सकला श्रुत झाले । भावार्थे पूजिता सर्वां इच्छित लाधले ।।जय०।।२।।

साधुवैश्यें संततिसाठी तुजला प्रार्थियले । इच्छित पुरता मदांध होऊनि व्रत न आचरिले ।

त्या पापाने संकटि पडुनि दु:खही भोगिले । स्मृति होऊनि आचरिलें व्रत त्या तुवांचि उद्धरिले ।।जय०।।३।।

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावति गेली । क्षोभ तुझा होताचि तयाचि नौका बुडाली ।

अंगद्वजरायासी यापरि दु:खस्थिती आली । मृतवार्ता शतपुत्रांशी सत्वर  कर्णी परिसली ।।जय०।।४।।

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी । पतिची नौका तरली देखे कलावति नयनी ।

अंगध्वजरायासी पुत्र भेटती येऊनि । ऐसा भक्तां संकटी पावसि तूं चक्रपाणी ।। जय०।।५।।

अन्यभावें पूजुनि हें व्रत जन आचरती। इच्छित पुरविसी त्यातें देऊनि संतति संपत्ती ।

संहारिसी भव दुरिते सर्वहि बंधनं तुटती । राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ।।जय०।। ६।।

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा । भक्ति पुरस्सर आचरती त्या पावसि जगदिशा ।

भक्तांचा कनवाळू कल्पद्रूम तूं सर्वेशा । मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ।। जय जय दीनदयाळा सत्यनारायण० ।।७।।

श्रीकृष्णाची आरती

ओवाळू आरती मदन गोपाळा ।

 शामसुंदर ग वैजयंती माळा ।। धृ०।।

 

चरणकमल ज्याचे अतिसुकुमार ।

ध्वजवज्राांकुश ब्रीदाचे तोडर । ओवाळू ० ।।१।।

 

नाभिकमल ज्याचे ब्रह्मयाचे स्थान ।

ह्रदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। ओवाळू ० ।।२।।

 

मुखकमल पाहतां सूर्याचिया कोटी ।

वेधलें मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू ०।।३।।

 

रत्नजडितमुकुट ज्याचा दैदीप्यमान ।

तेणें तेजे कोंदले अवघें त्रिभुवन ।। ओवाळू ० ।।३।।

 

एका जनार्दनी देखियेले रुप ।। रुप पाहों जाता अवघेंं झाले तद्रूप ।। ओवाळू ० ।।५।।

श्री राम

श्री नृसिंहाची आरती

श्री नृसिंहाची आरती

कडकडिला स्तंभ गडगडिलें गनन ।

अवनी होत आहे कंपायमान ।

तडतडली नक्षत्रें पडताती जाण ।

उग्ररुपें प्रगटे तो सिंहावदन ।।१।।

जय देव जय देव जय नरहरीराया ।

आरती ओवाळू  महाराजवर्या ।। धृ. ।।

 

एकवीस स्वर्ग माय डळमळली कैसी ।

ब्रह्माच्या वाटे अभिमान चित्तासी ।

चंद्र-सूर्य दोन्ही लोपती प्रकाशीं ।

कैलासी शंकर दचके मानसी ।।जय०।।२।।

 

थरथरती त्या जटा जिव्हा लळालळीत  ।

तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारीत ।

अर्धागी कमलजा शिरी छाया चरित ।

राघवदासा स्वामी नरहरी शोभत ।। जय० ।।३।।

दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म

श्री शनिदेवाची आरती

श्री शनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा श्री पद्मकर शिरी ठेवा । आरती ओवाळीतो । मनोभावें करुनी सेवा ।। धृ०।।

सूर्यसुता शनिमूर्ति । तुझी अगाध कीर्ति । एक मुखे काय वर्णू । शेषा न चले स्फूर्ती ।।जय०।।१।।

नवग्रहांमाजी श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा । ज्यावरी तूं कृपा करिसी । होय रंकाचा राजा ।। जय०।।२।।

विक्रमासारिखा हो शककर्ता पुण्यराशी । गर्व धरिता शिक्षा केली । बहु छळीयेलें त्यासी ।। जय०।।३।।

शंकराच्या वरदानें । गर्व रावणे केला । साडेसाती येतां त्यासी समूळ नाशासी नेला । जय०।।४।।

प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला । नेऊनी शूळापाशीं । पुन्हा सन्मान केला ।। जय०।।५।।

ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां । कृपा करी दिनावरी । महाराजा समर्था ।। जय०।।६।।

दोन्ही कर जोडूनियां रुक्मा लीन सदा पायीं । प्रसाद हाचि मागें । उदयकाळ सौख्यदायी ।।७।।

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरी ठेवा …

श्रीविष्णूच्या आरत्या

श्रीविष्णूच्या आरत्या

१.

 

आवडी गंगाजळे  देवा न्हाणीलें । भक्तीचें भूषण प्रेमे सुगंध अर्पिले ।।१।।

अहं हा धूप जाUू श्रीहरीपुढे । जंव जंव धूप जळे  तंव तंव देवा आवडे ।।२।।

रमावल्लभदासे अहं ।। धूप जाळीला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।।३।।

 

२.

 

सोहं हा दीप ओवाळू  गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।१।।

हरिख हरिक होता मुख पाहतां । चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।।२।।

सद्भवालागी बहु हा देव भुकेला । रमावल्लभ दासे अहं नैवेद्य अर्पिला ।।३।।

 

३.

 

फळे  तांबूल दक्षणा अर्पिली । तया उपरी निरांजने मांडिली ।।१।।

आरती करुं गोपा । मी तूं पण सांडोनि वेळोवेळा ।

पंचप्राण पंचज्योती आरती उजळली । दृश्य हे लोपले । तया प्रकाशस्थळी  ।।२।।

आरती प्रकाशे चंद्र सूर्य लोपले । सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।।३।।

देवभक्त पण न दिसे  कांही । ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ।। आरती०।।४।।

 

४.

 

करुणाकर गुणसागर गिरीवरधर देव । लीला नाटकवेष पहिला स्वभावे ।।

अगणित गुणलाघव हे कणवाला ठावे । वज्रानायक सुखदायक काय कीं वर्णावें।।१।।

जय देव जय देव जय लक्ष्मीरमणा । आरती ओवाळू तुज नारायणा।। धृ०।।

वृंदावन हरिभजन नूतन तनु लाभे । वक्रांग श्रीरंग यमुनातट शोभे ।

मुनिजनमानस लहरी जगजीवन उभे । रविकुळतिलक दास पदरज  त्या लाभे ।।२।।

जय देव जय देव जय लक्ष्मीरणा…

मारुतीची आरती

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनीं ।

कडाडिले ब्रह्मांड धाक त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पUणी ।।१।।

जय देव जय देव जय श्रीहनुमंता । तुमचेनि प्रसादें न भी कृतांता ।। धृ०।।

दुमदुमलीं पाताळे उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ।

कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। जय०।।२।।

ओम जगदीश हरे

खंडोबाची आरती

खंडोबाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषिनीळा । खंडामंडित दंडितदानव अवलीला ।

मणिमल्ला मर्दुनियां जो घूसर पिवळा । हिरे कंकणें बाशिंगे । सुमनांच्या माळा ।। धृ०।।

जय देव जय जय शिव मल्हारी । वारी दुर्जन असुरा भवरुस्तुर तारी ।।१।।

सुरवरसंवर वर दे मजलागी देवा । नाना नामें गाईन ही तुमची सेवा ।

अघटित गुण गावया वाटतसें हेवा । फणिवर शिणला ते किती नर पामर केवा।। जय०।।२।।

रघुवरस्मरणी शंकर ह्रदयी निवाला । तो हा मल्लतिक अवतार झाला ।

या लागी आवडी भावें वर्णिला । रामी रामदासा जिवलग भेटला ।। जय ०।।३।।

श्रीज्ञानदेवाची आरती

श्रीज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।। धृ०।।

लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नाम ठेविले ज्ञानी ।। आरती०।।१।।

कनकाचे ताट करी । उभ्या गोपिका नारी । नारद तुंबरु हो । साम गायन करी ।। आरती०।।२।।

प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें । रामा जनार्दनीं । पायी मस्तक ठेविलें ।। आरती०।।३।।

श्री तुकारामाची आरती

श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा । स्वामी  सद्गुरूधामा ।

सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवी आम्हां ।। आरती० ।। धृ०।।

राघवे सागरांत पाषाण तारिले । तैसे ते तुकोबाचे अभंग ।

उदकी रक्षिलें ।। आरती०।। १।।

तुकितां तुलनेसी ब्रह्म तुकासी आले । म्हणोनी रामेश्वरे । चरणीं मस्तक ठेवलें ।। आरती ०।।२।।

श्री साईबाबांची आरती

श्री साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा । चरणरजतळी  निज दासां विसावा, भक्ता विसावा ।।धृ०।।

जाळुनीया अनंता । स्वस्वरुपी राहे दंग । मुमुक्षुजना दावी । निज डोळा श्रीरंग ।। आ०।।१।।

जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव दाविसी दयाघना । ऐसा ही तुझीही माव ।। आ०।।२।।

तुमचे नाम ध्यातां हरे संसृति व्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ।। आ०।।३।।

कलियुगी अवतार । सगुण परब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ।। आ०।।४।।

आठा दिवसा गुरूवारी । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । भवभय निवारी ।। आ०।।५।।

माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरज सेवा । मागणें हेंचि आतां । तुम्हां देवाधिदेवा ।। आ०।।६।।

इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ।। आ०।।०७।।

श्रीरामदासाची आरती

आरती रामदासा । भक्तविरक्त ईशा ।

उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ।। धृ०।।

साक्षात शंकराचा । अवतार मारुती ।

कलिमाजी तेचि झाली । रामदासाची मूर्ति ।।१।।

वीसहो दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ।

जडजीवं उद्धरिले । नृप शिवासी तारिले ।।२।।

ब्रह्मचर्य व्रत ज्याचे । रामरुप सृष्टी पाहे ।

कल्याण तीहीं लोकी । सामर्थ्य सद्गुरूपाया ।।३।। आरती ०।।

श्री एकनाथाची आरती

आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनी तूंच थोर । जगद्गुरू जगन्नाथा ।। धृ०।।

एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गूज । संसार दु:ख नासे । महामंत्राचे बीज ।। आरती० ।।१।।

एकनाथ नाम घेतां ।। सुख वाटले चित्ता । अनंत गोपाळदास । धनी न पुरे गाता ।। आरती ०।।२।।

निरांजन आरती

पंचप्राणांचें निरांजन करुनी । पंचतत्वें वाति परिपूर्ण भरुनी ।

मोहममतेचे समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनि  ।।१।।

जय देव जय देव जय निरांजना । निरांजना ओवाळू  तुझिया समचरणा ।।धृ०।।

ज्वाला न काजळी  दिवस ना राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ।

पूर्णानंदे धालों बोलों मी किती । उजळो  हे शिवराम भावें ओवाळीती ।।२।।

घालिन लोटांगण

मंत्रपुष्पांजलि

वरप्रसाद

आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासां ।।१।।

कल्पनेची बाधा न हो कोणे काळी  । ही संतमंडळी  सुखी असो ।।२।।

अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासां भाविकांसी ।।३।।

नामा म्हणे तयां असावे कल्याण । ज्या मुखी निदान पांडुरंग ।।४।।

प्रदक्षिणा

प्रदक्षिणा

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा । विमान उतरायाची ।। धृ।।

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या रासी । सर्वही तीर्थ घडली आम्हां आदिकरुनी काशी ।।१।।

मृदुंग टाU ढोल भक्त भावार्थ गाती । नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती ।।२।।

कोटि ब्रह्महत्या हरीं करिता दंडवत । लोटांगन घालितां मोक्ष लोळे  पायांत ।।३।।

गुरूभजनाचा महिमा न कळे  आगमा-निगमांसी । अनुभव ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।।४।।

प्रदक्षिणा करुनि देह भावे वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।।५।।

निरोप गीत

निरोप गीत

जाहले भजन आम्ही नमितों तव चरणा, नमितों तव चरणा ।

वारुनियां विघ्ने देवा रक्षावे दीना ।। धृ०।।

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों।  प्रेमें करुनियां देवा तुझे गातो ।। जा०।।१।।

तरी द्यावी सिद्धी देवा हेचि वासना । रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हांसी आज्ञा ।। जा०।।२।।

मागणें ते देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे । तारुनियां सकळा आम्हां कृपादृष्टी पाहें ।। जा०।। ३।।

जेंव्हा सर्व आम्ही मिळु  ऐशा या ठाया, ऐशा या ठाया, प्रेमानंदे लागंू तुझी कीर्ति गाया ।। जा०।।४।।

सदा ऐशी भक्ती राहो आमच्या मनीं, आमुच्या मनीं । हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ।। जा०।।

वारुनियां संकटें आता आमची सारी, आतां आमचुी सारी । कृपेची साऊली देवा दीनावरि करीं ।। जा०।।६।।

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी,  चिंता तुम्हां असावी । सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षाची ।। जा०।।७।।

निरोप घेतो आतां आम्हां आज्ञा असावी, आज्ञा असावी।।

चुकलें आमचे कांही त्याची क्षमा असावी ।। जा०।।८।।

पसायदान

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.