कंकनाकृती सूर्यग्रहण

दि . 21 जून 2020 रोजी कंकणाकृती सूर्य ग्रहण होत आहे. या भौगोलिक घटनेचे होणारे शुभाशुभ परिणाम जाणून घेऊ या …

ग्रहणाचा वेध आरंभ : 20 जूनच्या रात्री 10।00 पासून सुरु होत असून तो ग्रहण मोक्षापर्यंत असेल.

प्रत्यक्ष ग्रहण दि 21।06।2020 रोजी आहे. त्याचा क्रम पुढीलप्रमाणे :-

स्पर्श सकाळी : 10।01
मध्य दुपारी : 11।38
मोक्ष दुपारी : 13।28

असा एकूण पर्वकाळ 3 तास 27 मिनिटे असेल.

ग्रहण काळात काय करावे ? काय करू नये ?

१- ग्रहण काळात दैवी उपासना केल्याचे अनेक फायदे होतात. विशेषतः श्री गणेश अथर्वशीर्षाचा पाठ केल्यास तो सिद्ध होतो असे वचन याच पाठाच्या फलश्रुतीत आलेले आहे. ”सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति ।” त्याच श्रद्धेने हा पाठ जरूर करावा. तसेच गुरुमंत्र , नित्य उपासनेचे जप-स्तोत्र अथवा पाठ, विविध उपासना कराव्यात.

२- वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राध्द ही कर्मे करता येतील.

३- भोजन निषिध्द आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत मात्र आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप ही कर्मे करता येतात. मात्र दि 21 रोजी सकाळी10 ते 1।28 या वेळेत ही कर्में करू नयेत.*

४- *बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सकाळी 10।01 ते 13।28 पर्यंत नियम पाळणे शास्त्रसंमत ठरेल।
५- पुण्यकाल.- ग्रहणस्पर्शापासून ते ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे.
६- ग्रहणातील कृत्ये- ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राध्द, जप, होम, दान करावे.
पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण सूर्यग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.
७ – ग्रहण पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन किंवा कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाणे,कामविषयसेवन ही कर्मे करु नयेत.
८- अशौच (सोयर-सुतक) असता ग्रहणकाळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापुरती शुद्धी असते.

९- ग्रहणाचे राशीपरत्वे फल.
*शुभ : मेष,सिंह,कन्या,मकर *
मिश्र : वृषभ,तुला,धनु,कुंभ.
अनिष्ट : मिथुन, कर्क,वृश्चिक, मीन

*ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी आणि गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.