चातुर्मास : या ४ महिन्यात काय करावे आणि काय करू नये
चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. या दिवसांमध्ये गूळ, तेल, दह्यासोबत तांदूळ, मुळा, वांगे, कांदा खाण्यापासून दूर राहावे.
हिंदू पंचांगानुसार १ जुलै 2020 पासून चातुर्मास सुरू होत .
आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात.
या काळात अनेक व्रत-उपासना केल्या जातात
चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत…
१. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र) सेवन करावे.
- पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त (एकदाच जेवण), आयाचित (न मागितलेले) जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.
३. तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये.
४. चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये.
५. पलंगावर झोपू नये, मांस खाऊ नये, मध, गुळ, हिरव्या भाज्या, मुळा, वांगे हे पदार्थही खाऊ नयेत.
पुढे जाणून घ्या, चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि याचे महत्त्व..
आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो.
यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते.
चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम महिना असा याचा शब्दश: अर्थ निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यांत भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात.
काही जण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात.
काही जण जप-तप करतात, तर काही जण या चार महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात.
या चार महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्यांचे अध्ययन करणे गरजेचे आहे. यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल
गुरूंकडून जाणून घ्या योग्यता –
चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. चातुर्मासाच्या सुरुवातीलाच गुरुपौर्णिमा येते. वरील सर्व कार्य गुरूंच्या सान्निध्यात, त्यांच्या चरणाशी लीन होत, त्यांच्याकडून विद्या प्राप्त करत करायची असतात. याच महिन्यात रक्षाबंधनही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील.
तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे?,
कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरू करून देतील. आणि म्हणून तुलसीदास यांनी म्हटले आहे,
एहि कालिकाल न साधनदूजा. योग, यज्ञ, जप, तप, व्रत पूजा’. (तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील.