दर्भ
दर्भ
——–
दर्भ अनेक वर्षे जगणारे गवत आहे. कोकण प्रांत, नाशिक, गुजरात, काठेवाड, सिंध, हैदराबाद, न्यूबिया, इजिप्त, सिरिया आदी प्रदेशांत ते आढळते. तळापासून दर्भाला अनेक फांद्या येतात. जमिनीतील खोड जाडजूड, आडवे वाढणारे असते. जमिनीवरील खोडाच्या तळभागापासून निघून पुन्हा जमिनीसरपट वाढणारी शाखा निघते. कणखर, चकचकीत, खोडास वेढणाऱ्या पानांच्या तळांनी ते झाकलेले असते. पाने साधी, एकाआड एक, अनेक, अरुंद, ताठर असून तळाशी झुबक्यांनी येतात. डिसेंबर महिन्यात दर्भाला कणिशके येतात. कणिशकांची रचना आणि इतर सामान्य लक्षणे ही तृण कुलात, तृण गणात वर्णण केल्याप्रमाणे असतात.
दर्भाचे महत्व अनन्यसाधारण आहे; कारण दर्भाला विविध धार्मिक विधीत, भाद्रपद कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये दर्भ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. खरेतर दर्भाचे जतन अन् संवर्धन केले पाहिजे. वर्षभर हे दर्भ अनेक कारणांसाठी वापरले जाते.
अनेकदा हा दर्भ काही केले तरी मिळत नाही. अशावेळी झरे, नदी, ओढे, जिथे पाणथळ जागा आहे, तिथे दर्भाचे संवर्धन करावे.
*दर्भ हे एक प्रकारचे गवत आहे.*
ते उष्ण भागात अन् ओलसर ठिकाणी सापडते. भूरिमूल (अनेक मुळ्यांचा), कुश, सहस्त्रपर्ण आणि शतकंद अशी दर्भाची काही नावे आहेत. हे कुठेही उगवले तरी ते ओळखणे कठीण असते; कारण अन्य गवतांसारखेच ते दिसते. पाणथळ ठिकाणी टायफा (पाणकणीस), अन्य गवतांच्या प्रजातीही असतात. त्यामुळे अशा अनेक गवतांच्या प्रजातीमधून गर्भ अचूकपणे शोधणे महत्वाचे असते. ज्यांना दर्भ कसे असते हे माहिती असते, तेच लोक दर्भ अचूकपणे ओळखतात.
दर्भाला होमहवन, श्राद्ध पक्ष आदीमध्ये अपार महत्त्व आहे. ऋग्वेद, तदुत्तर ग्रंथांत दर्भाचा उल्लेख असून अथर्ववेदात ही काही उपयोग सांगितले आहेत.
१) दर्भाचे खोड आणि फांद्या उत्तेजक, मूत्र साफ करणाऱ्या असून कोकणात इतर औषधांबरोबर काढा करून आमांशावर वापरतात.
२) दर्भाच्या मुळ्या थंडावा देणाऱ्या असता. दुसरे म्हणजे, दोर बनविण्यास दर्भाचे धागे वापरतात.
३) स्वस्त बदामी कागद बनविण्यासाठी दर्भाच्या धाग्यांचा उपयोग होतो.
४) दर्भाच्या चटईसुद्धा तयार करतात. शिवाय पाणथळ जागी दर्भाची शेती केली तर,
५) दर्भाच्या चटया, दर्भाच्या अंगठ्या तयार केल्या तर अर्थाजन होऊ शकते; कारण दर्भाचा उपयोग हा अनेक कारणांनी होत असतो.
*६) योगसाधना, योगासने करण्यासाठी दर्भाच्या चटया, दर्भाची आसने केली तर ती अनेकांना उपयोगी होतील.*
७) “होमहवन, धार्मिक विधी, मंदिरातील पूजाअर्चा, श्राद्ध आदीमध्ये दर्भ वापरले जाते. ते नदी ठिकाणी साडपते. जेव्हा पूजा करायची असते, तेव्हा ते जाऊन आणावे लागते. अनेकदा ताजे दर्भही मिळते; तर काहीवेळा दर्भाच्या छोट्या मोळ्या तयार करुन ठेवल्या जातात. हा दर्भ वर्षभर उपयोगाला आणले जाते.”