दशक्रिया पिंडदान आणि कावळा
दशक्रिया पिंडदान आणि कावळा :
काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते .
उदा:-
1) गाढवाला विषबाधा समजते विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत होते.
2) कासव फक्त दृष्टीने पिल्लाचे पोषण करते
3) त्याच प्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो काही वाईट घडणार असेल तर ती केविलवाणी किंचाळतात .किल्लरी भूकम्पाच्या आधी ही प्रचिती आली होती .
4) गिधाड याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते प्राणी मेला की क्षणात दूरदूर अंतरावरून गिधाडांच्या थवे तेथे येतात कशामुळे होते हे.
5) मांजर हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो.
6) वटवाघूळ दिवसा दिसत नाही पण रात्री पाहू शकते.
7) आता कावळ्या संदर्भात:
माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो कुणी त्याला आत्मा , कुणी जीव , कुणी प्राण , कुणी चेतना असे म्हणतो बाहेर काही तरी पडते आणि ते अगोचर म्हणजे न दिसणारे असते .हिंदू धर्मानुसार बाहेर पडणार जीवात्मा असतो तो कुणाला दिसत नाही .परंतु पिंडदाना पर्यंत तो तेथे घुटमळत असतो .त्याला सर्व दिसते पण त्याला कोणी पाहू शकत नाही ज्या प्रमाणे गाढव , कुत्रा, मांजर, गिधाड, वटवाघूळ किंवा कासव ह्यांना विशिष्ट शक्ति असते तशीच एक शक्ती कावळ्याच्या ठिकाणी असते त्याला तो आत्मा दिसतो ज्यावेळी कावळा पिंडाला शिवायला जातो त्यावेळी तो आत्मा जर अतृप्त असेल तर आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही पण त्याचा कुठे जीव अडकला असेल आणि त्याचा उघड किंवा मनात संकल्प केला व त्याची इच्छा पूर्ण करू असा शब्द दिला तर आत्मा त्याला पिंड स्पर्श करू देतो .आणि तृप्त असेल तर पटकन कावळा शिवतो अशी मान्यता आहे .ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न हे बरोबर की चूक हेही सांगू शकत नाही पण ही प्रथा अनादी काळा पासून चालत आली आहे .रामायणात तसेच महाभारत ह्याचा उल्लेख आढळतो. महाभारत युद्धा नंतर धर्मराज पिंड दान करतो त्यावेळी कृष्ण त्याला अजून एक पिंडदान कर्णाच्या नावाने कर म्हणून सांगतो त्याचा सपूर्ण विधी गरुड पुराणात आला आहे .एवढी प्राचीन परंपरा आहे म्हणजे त्यात काही तरी तथ्य असावे असे मला वाटते आपले मत भिन्न असू शकते .
काही लोकांनी जिवंत माणसाच्या नावाने पिंडदान केले तर तेथे कावळा शिवला असे दाखवून हा विधी खोटा आहे असे भासवले मला तरी त्यात विशेष काहीच वाटले नाही.जो माणूस जिवंत आहे त्याचा आत्मा तेथे असण्याचा प्रश्नच नाही कावळ्याला अडवायला आत्मा नसतो त्यामुळे तो शिवतोच.