महालय – पितृपक्ष
श्राद्ध आणि त्याचे नियम आणि प्रकार, पितृपक्ष, दर्भ्, मृत्यू तिथी माहीत नसल्यास काय करावे, तर्पण म्हणजे काय, मोक्ष दायिनी सप्तपुऱ्या, महालय – पितृ पक्षाच्या तिथी ही माहिती एकत्रित…
श्राद्ध: –
पितरांना संतुष्ट करण्यासाठी केला जाणारा एक हिंदू धर्मविधी.
श्राद्ध हा शब्द ‘ श्रद्धा’ ह्या शब्दापासून
आलेला आहे. पितरांच्या हितार्थ, त्यांना उद्देशून योग्य काळी व स्थळी सत्पात्र व्यक्तींना आणि बाह्मणांना धर्मशास्त्रात सांगितलेल्या, बल, लक्ष्मी, पशू , सौख्य, विधीनुसार जे श्रद्धापूर्वक देण्यात येते, त्याला श्राद्ध म्हणतात.
श्राद्ध केल्याने आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी धन, धान्य ह्या गोष्टींची प्राप्ती होते, असा उल्लेख स्मृतिचंद्रिका व इतरही काही गंथांत आढळतो.
श्राद्धक्रिया प्रथम मनूने सुरू केली, असे ब्रह्माण्ड पुराणात म्हटले आहे. विष्णू व वायू या पुराणांमध्ये मनूला ‘ श्राद्धदेव’ म्हटले आहे, त्याचे कारण हेच दिसते.
प्राचीन काळी श्राद्धाला पिंडपितृयज्ञ हे नाव होते.
महापितृयज्ञ किंवा अष्टका हे शब्दही श्राद्ध या अर्थी वापरलेले आहेत पण अष्टका ह्याचा अर्थ कोणत्याही महिन्यातील वद्य अष्टमी ही तिथी होय. श्राद्ध हा शब्द कठोपनिषदात प्रथम आढळतो.
श्राद्धकल्पना ही पुनर्जन्म व कर्मविपाक इ. सिद्धांतांच्या नंतरची आहे, असे म्हणतात.
याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे, की वसू , रूद्र आणि आदित्य ह्या श्राद्धातल्या देवता आहेत. श्राद्धामुळे त्या संतुष्ट होऊन माणसांच्या पूर्वजांना संतोष देतात.
ह्याचा अर्थ असा सांगितला जातो : पिता, पितामह आणि प्रपितामह ह्या तीन पूर्वजांच्या अधिष्ठात्री देवता अनुक्रमे वसू , रूद्र आणि आदित्य ह्या असून
संबंधित पितराचे आपल्या अधिष्ठात्री देवतेशी ऐक्य असते.
⇨हेमाद्री ( हेमाडपंत) याने ⇨चतुर्वर्गचिंतामणि ह्या गंथात परिशेष या पाचव्या भागात श्राद्ध हे एक प्रकरण अंतर्भूत केले आहे.
⇨पूर्वमीमांसेत निष्णात असलेल्या हेमाद्रीने श्राद्धाचे विवरण त्या मीमांसेनुसार तपशीलवार केले आहे.
श्राद्धाची प्रथा इ. स. पू. पासून अनेक शतके चालू आहे. आपले पितर आपले हित किंवा अनहित करू शकतात, ही कल्पना प्राचीन काळापासूनची आहे
( उदा., ऋग्वेद �१०.१५.६). त्यामुळे त्यांना प्रसन्न ठेवून आपले हित साधण्याच्या हेतूने प्राचीन मानवाने त्यांना काही पदार्थ विधिपूर्वक अर्पण करावयास
आरंभ केला असावा आणि पुढे पितरांविषयीच्या प्रेम व पूज्य भावनेतून हे केले जाऊ लागले असावे.
-संकलन :- रविंद्र पाठक गुरुजी