मूर्ती प्राणप्रतिष्ठा – जीर्णोद्धार

भारतीय संस्कृतीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती बनवून त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते.  या प्रयोगाच्या दोन प्रमुख पद्धती आहेत.

१ – स्थिर प्राणप्रतिष्ठा- मंदिरात करण्यात येत असलेली स्थिर स्थापना .

२ – चलाचल  प्राणप्रतिष्ठा- काही ठिकाणी मंदिरात पूर्वापार असलेल्या मूर्तींची स्थिर स्थापना झालेली नसते अशावेळी आयोजकांशी चर्चा करून , यज्ञयागामध्ये,  तसेच घरातील नित्यपूजेच्या देवदेवतांची स्थापना याप्रकारे केली जाते.

देवतेच्या स्थापनेसाठी मंदिर प्रासादाची निर्मिती केली जाते. त्यालाही शास्त्रोत संदर्भ आढळून येतात. मंदिर व मूर्तीची उत्तम शिल्पकलेचे उदाहरण अनेक ठिकाणी पहायला अभ्यासायला  मिळतात.

शिवाय वर्षभरात साजरे होत असलेल्या श्री गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, हरतालिका आदी व्रतवैकलयाचे वेळी देखील पार्थिव मृन्मयी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ठराविक सण व्रताचे दिवशी त्यांचे विसर्जन करण्याची प्रथा देखील प्राचीन काळापासून प्रचलित आहे.

 

मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठेसाठी विशिष्ट मुहूर्ताची योजना शास्त्रात करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे योग्य मुहूर्त जाणकारांकडून काढून घेणे आवश्यक आहे. स्वयंभू देवदैवतांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र त्याचेसाठी आवश्यक पूजन – यजनादी विधिविधान विधियुक्त करणे क्रमप्राप्त आहे.

 

प्राणप्रतिष्ठेचे प्रकार :

१ – ब्रह्मशिलायोगे प्रतिष्ठा: नवीन वास्तूमध्ये सिंहासनावर ब्रह्मशिला -कूर्मशील-पिण्डिका -व नवीन प्रतिमेची विधिवत स्थापना करणे.

२ – पीठे निवेशनं स्थापनम्: जुन्या प्रसाद वास्तू मध्ये अखंडित जुनी अथवा नवीन मूर्तीची स्थापना करणे.

३ – भिन्नपीठे स्थित स्थापनम्:  जीर्ण प्रसादाची पुनर्निर्मितीसाठी चालन विधि केलेली प्रतिमा अथवा नवीन मूर्तीची स्थापना करणे.

४ –  उत्थापन: स्थिपित मूर्ती -प्रतिमा जीर्ण -शिरणं , खंडित , भग्न , उत्तमांग अथवा मध्यमांग झाली असेल तर जीर्णोद्धार विधीने विसर्जन करणे.

५ – आस्थापनम्: मंदिरातील स्थिर प्रतिमा काही कारणाने स्वस्थानभ्रष्ट झाली तर तिची विधिवत पुनर्स्थापना करणे.

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.