Blog

मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?* *||आपत्कालीन श्राद्ध प्रकार||*

मृत्यूतिथी माहीत नसेल तर काय करावे?*
————————————————-
 _मृत्यू तिथी माहीत नसेल तर काय करावे याचे विधान शास्त्रात पुढील प्रमाणे सांगीतले आहे._
१) मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना ठावुक असेल तर त्या महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२) मृत्यू तिथी किंवा महीना कांहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
३) एखादि व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही, कांहीच वार्ता लागली नाही तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
४) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली आणि कधी मृत झाली ते कळले नाही मात्र मृत झाली आहे ही बातमी ज्या तिथीला कळेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
*५) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली , शोध लागला नाही तर पंधरा वर्ष वाट पहावी. पंधरा वर्षात आला नाही तर त्याची प्रतिमा करुन त्यावर अंत्य विधी करावा, चवदाव्या दिवसा पर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत व प्रतिमेला अग्नी दिला ती तिथी धरावी.*
 या ठिकाणी मी हे सांगु इच्छितो की कांही मंडळी पुढाऱ्यांचे पुतळे जाळतात हे अतीशय अशुभ कर्म आहे.असे करु नका.
६) पंधरा वर्ष वाट पाहुन मृत झाला असे समजुन अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करुन त्याला व्यवहारात घ्यावे.
७) श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सूतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब श्राद्ध करावे.किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावास्येला श्राद्ध करावे अथवा पुढील महीन्याच्या त्याच तिथीला करावे.
८) श्राद्ध करणाऱ्यांच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिण्ड न करता श्राद्ध करावे किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध करावे आणि महालय श्राद्ध असेल तर ते पुढे ढकलावे.
 महालय श्राद्ध दिवाळी पर्यंत केंव्हाही करता येते.
९) पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासात असाल तर शिधा द्यावा अथवा हिरण्यश्राद्ध करावे म्हणजे नुसती दक्षिणा द्यावी.
१०) संध्याकाळी , सध्याकाळच्या जवळच्या वेळेला अथवा रात्री श्राद्ध करु नये.
११) श्राद्ध शक्यतो तळमजल्यावर स्वतःच्या घरातच करावे अथवा दुसऱ्याच्या घरात त्याच्या परवानगीने करावे.
———————————————-
*||आपत्कालीन श्राद्ध प्रकार||*
———————————————-
१) श्राद्धाच्या दिवशी आचार संपन्न उत्तम ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील तसे सांगुन श्राद्ध करावे.
२) आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसतील तर सुवासिनी बोलवुन(सांगुन) श्राद्ध करावे.
३)कोणीच ब्राह्मण मिळाले नाहीत तर पाटावर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत आणि यथाविधी श्राद्ध करावे.याला *चटश्राद्ध* असे म्हणतात .
४) स्वतःला राजकार्यामुळे, तुरुंगवासामुळे, अथवा अजारपणामुळे श्राद्ध करण्यास जमत नसेल तर आपल्या पुत्राकडून, शिष्याकडून अथवा ब्राम्हणाकडून श्राद्ध करुन घ्यावे.
५) विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर *आमश्राद्ध* करावे. आमश्राद्ध म्हणजे शिधा देवुन बाकी श्राद्धाचे सर्व विधी करावेत.
६) क्रमाने वरीलप्रमाणे श्राद्ध करणे शक्य नसेल तर *हिरण्यश्राद्ध* करावे. हिरण्यश्राद्ध म्हणजे फक्त दक्षिणा देवुन केले जाणारे श्राद्ध . या श्राद्धात पिण्ड दान करत नाहीत
.७) *ब्रह्मार्पणविधीने*
श्राद्ध करावे.
ब्रह्मार्पणविधी म्हणजे ब्राम्हणांना घरी बोलावुन हातपाय धुतल्यावर आसनावर बसवावे,त्यांची पंचोपचार पूजा करावी आणि *पितृस्वरूपी जनार्दन वासुदेवो प्रीयताम्* असा संकल्प करुन भोजन घालावे व दक्षिणा द्यावी.
८) *पिण्डश्राद्ध* करावे. पिण्डश्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिण्ड दान करावे.येथे ब्राह्मण भोजन नाही घातले तरी चालते.
९) वरिल कांहीही करणे शक्य नसेल तर पितरांच्या नावाने पाण्याने भरलेला कुंभ ब्राह्मणाला द्यावा.
१०) एखाद्या गरीबाला, भुकेल्याला अन्न देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
११) ब्राम्हणाला तीळ देवुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१२) थोडी दक्षणा देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१३) यथा शक्ती धान्य देवुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१४) गाईला गवत घालुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१५) तिलोदकाने तर्पण करावे.अथवा
१६) थोडे गवत जाळुन पितरांचे स्मरण करावे.अथवा
१७) श्राद्धाच्या दिवशी उपवास करुन पितरांचे स्मरण करावे. अथवा
१८) श्राद्ध विधी वाचावे, किंवा ही माहीती वाचून पितरांचे स्मरण करावे.
१९) या पैकी कांहीही करणे शक्य नसेल तर वनात जावुन गवताची काडी सूर्याला व लोकपालांना दाखवून दोन्ही हात वर करुन प्रार्थना करावी की , *हे पितरांनो माझ्याजवळ श्राद्धाकरिता कांहीही धनसंपत्ती नाही.मी सर्व पितरांना नमस्कार करतो.माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त होवोत.* अथवा
२०) निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणावे हे पितरांनो मी निर्धन आहे, मला पितृरूणातून मुक्त करा. अथवा
२१) दक्षिणेकडे तोंड करून रडावे.
अर्थात हे सर्व पर्याय आहेत.
यावरून आपल्या असे लक्षात आले असेल की प्रति वर्षी श्राद्ध करणे किती महत्वाचे आहे. जेवढे कुळधर्म कुळाचाराला महत्व आहे तेवढेच महत्व दर वर्षी येणाऱ्या श्राद्ध कर्माला आहे.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.