याचाच एक भाग शांती, यज्ञ आहे। जातकाच्या जन्मकाळीं अशुभ किंवा कुयोग असल्यास, ग्रहांचे युती अथवा दृष्टी, ग्रहांची भ्रमण स्थिती, दशा आदिचा अभ्यास मांडून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात। त्याने मनुष्य अधिक सकारात्मक होऊन अडचणींचा सहज सामना करू शकतो किंवा अडचणींवर मात करू शकतो।
त्यासाठी आवश्यक ती दैवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे सिद्ध प्रयोग केल्याने फायदा होतो। भारतीय संस्कृतीतील आचरण पाळणाऱ्या लोकांचा असा अनुभव देखील आहे।
हे सर्व विधी प्रयोग असून आपले पूर्वज असलेल्या ऋषींनी त्याचे संशोधन करून ठेवलेले आहे।
ग्रहपीडा परिहारार्थ उपाय:
भानु: तांबूलदानादपहरति नृणां वैकृतं वासरोत्थं
सोम: श्रीखंडदानादवनितनुभवो भोजनात्पुष्पदानात् ।
सौम्य: शक्रस्य मंत्री हरिहरनमनाद्भार्गव: शुभ्रवस्त्रै –
स्तैलस्नानात्प्रभाते दिनकरतनयो ब्रह्मनत्या परौ च ।।
देवब्राह्मणवंदनाद्गुरूवच:संपादनात् प्रत्यहं
साधूनामभिभाषणात् श्रुतिरवश्रेय: कथाकर्णनात्।
होमादध्वरदर्शनाच्छुचिमनोभावाज्जपाद्दानतॊ
नो कुर्वंन्ति कदाचिदेव पुरुषस्यैवं ग्रहा: पीडनम् ।।
ग्रहेषु विषमस्थेषु शांति यत्नात्समाचरेत ।
हानिवृद्धी गृहाधीने तस्मात्पूज्यतमा ग्रहा: ।।
होतव्या मधुसर्पिभ्यां दघ्ना क्षीरेण वा युत: ।
नरो य: कुरुते सम्यक् ग्रहयज्ञम् विधानात: ।
ग्रहपीडा जपाद्दानात्तस्य नश्यन्ति निश्चितम्।।
तस्माद्दातुमशक्तो यो दक्षिणां चान्नमेव वा ।
जपै: प्रणामै: स्तोत्रैश्च तर्पणे: तोषयेत्ग्रहान् ।।
– ज्योतिर्मयुख पृष्ठ क्र.- २६४-२६५
ग्रहपीडा निवारणार्थ उपाय:
रवी – तांबूलदान
चंद्र – चंदन
मंगळ – अन्नदान
बुध – पुष्प दान
गुरु – विष्णु व शंकरास नमस्कार करणे.
शुक्र – शुभ्र वस्त्रं दान किंवा धारण करणे.
शनी – प्रातःकाळी तेल लावून स्नान करणे.
राहू-केतू -ब्राह्मणांस नित्य वंदन करणे.
त्यामुळे मानसिक व्यथा, हानी, शरीर कष्ट दूर होतात. स्वधर्माचरण केल्याने ग्रहपीडा सौम्य होतात.
देव आणि सच्छील विद्वान ब्राह्मण यांस नित्य वंदन केल्याने , गुरुची आज्ञा पालन केल्यानें , सज्जनांशी संभाषण , वेदमंत्र आणि पुण्य पुरुषाच्या कथा श्रवण केल्याने , ग्रहांप्रीत्यर्थ होम, यज्ञाचे दर्शन , मनाच्या ठिकाणी पावित्र्य ठेवणे , ग्रहांच्या मंत्राचा जप , ग्रहांची पूर्वोक्त दाने , इत्यादि कर्मे निर्विकार अंत:करणाने केली असता त्या पुरुषाला (जातकाला ) ग्रह कदापि पीडा करीत नाहीत.
अनिष्टस्थानी ग्रह असता विधिपूर्वक ग्रहयज्ञ केला म्हणजे सर्व पीडा नाश पावतात. लाभ, हानि इत्यादि शुभाशुभ सर्व ग्रहांच्या आधीन आहे. म्हणून शांती करून ग्रह अनुकूल करून घ्यावेत. शुचिर्भूतपणाने यथासांग ग्रहांचा जप स्वतः केला तर प्राप्त संकट निवारण होते. ग्रहयज्ञाप्रित्यर्थ दक्षिणा देण्यास किंवा ब्राह्मणभोजन करण्यास जो असमर्थ असेल त्यानें गृहमंत्राचा जप, स्तोत्रपाठ , तर्पण किंवा नमस्कार इत्यादी भक्ती स्वतः करून ग्रह संतुष्ट करावेत.
जातकाच्या जन्मकुंडलीत तिथी-वर-नक्षत्र-योग-करणं-गृहयुती-ग्रहांच्या दृष्टी – दशा स्वामीचे अनिष्ट फल , शनीची साडेसाती अशा अनेक प्रकारे घेणाऱ्या योगामुळे मानवी जीवनात समस्या निर्माण होतात. त्या समस्या सहज आणि सुलभतेने सुटाव्यात त्यांचे दुष्परिणाम दूर व्हावेत यासाठी जननशांती , पूजा , जप अनुष्ठान , दानधर्म यासारखे उपाय केल्याने फायदा होतो. म्हणून ती जाणकारांकडून शास्त्रोक्त पद्धतीने करावीत.
कालसर्प शांती:
जातकाच्या जन्मकुंडलीवरून हा योग आहे की नाही याबाबत निदान करता येते. विधीसाठी शिवालय , नदीकिनारा, जलाशय आदि अनिवासी वास्तू असणे प्रशस्त मानले आहे. याचे असंख्य लोकांनी शुभ अनुभव घेतले आहेत. हा विधी करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त काढण्याची आवश्यकता असते तसेच जाणकारांकडून त्याबद्दल व्यवस्थित माहिती घेणे आत्मोन्नतीस फायदेशीर ठरते.
अतिशय उपयुक्त माहिती:
नक्षत्र , जनन शांती व त्यांच्या देवता:
१) कालसर्प शांती: राहू, काल ,नवनाग.
२) अमावस्या जनन शांती: पितृ ,चंद्र ,सुर्य.
३) कृष्ण चतुर्दशी शांती: रुद्र , अग्नी, वृषभ.
४) क्षय तिथी जनन शांती: ज्या तिथिस जन्म झाला असेल त्या तिथिंचि देवता.
५) अश्विनी नक्षत्र शांती: पूषण, अश्विनी कुमार ,यम. (फक्त पहिले चरण )
६) पुष्य नक्षत्र शांती: अदिती, बृहस्पती ,सर्प. (फक्त २ रे ३ रे चरण)
७) आश्लेषा नक्षत्र शांती: बृहस्पती, सर्प ,पितृ .
८) मघा नक्षत्र शांती: सर्प, पितृ , भग. (फक्त पहिले चरण )
९) उत्तरा नक्षत्र शांति: भग, अर्यमा, सुर्य . (फक्त पहिले चरण )
१० ) चित्रा नक्षत्र शांती: सुर्य, त्वष्टा ,वायू . (पहिले २ चरण)
११) विशाखा नक्षत्र शांती: वायू, इंद्राग्नी, मित्र . ( पहिले चरण)
१२) ज्येष्ठा नक्षत्र शांती: मित्र , इंद्र ,निऋति .
१३) मूळ नक्षत्र शांति: इंद्र , निऋति, उदक.
१४) रेवती नक्षत्र शांती: अहिर्बुध्न्य, पूषण, अश्विनीकुमार. (फक्त ४ थे चरण )
१५) वैधृति योग शांती: रुद्र , सूर्य , सोम.
१६) व्यतिपात योग शांती: अग्नि, , सूर्य, रुद्र
१७) भद्रा (विष्टिकरण) शांती: सुर्य ,अग्नी ,रुद्र ,विष्णू ,गणेश .
१८) ग्रहण काळात जन्म झाला असेल तर शांती: सुर्य ,चंद्र ,राहू .
१९) यमल (जुळे) शांती: इंद्र ,वरूण, अग्नी , सोम, मरुत,आणि वायू .
२०) सदन्त जन्म (जन्मतः दांत असतील तर ) जनन शांती: सोम, अग्नी, वायू, विष्णू, आणि धात्री .
२१) पायाळू जन्म झाला असेल तर जनन शांती: विष्णू, रुद्र .
२२) गोमुख प्रसव शांती: विष्णू, वरूण ,यक्ष्माण.
२३) विष नाडी शांती: रुद्र, अग्नी ,विष्णू ,यम .
२४) गंड योग जनन शांती: मरुत :
२५) अति गंड योग जनन शांती: ब्रह्मा, विष्णू ,रुद्र ,मरुत ,चंद्र.
इति
२६) वयोवस्थाभिध शांती:
मानवाच्या वयाच्या वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या शांती केल्या जातात त्यांची नांवे व देवता पुढीलप्रमाणे:
वय – शांती – देवता
50 – वैष्णवी- विष्णु, मृत्युंजय
त्र्यंबक
55 – वारूणी- वरुण, त्र्यंबक
60 – उग्ररथ – मार्कंडेय,मृत्युंजय त्र्यंबक
65- मृत्युंजय महारथी- मृत्युंजय महारथ
70- भैमरथी – भीमरथ, मृत्युंजय रूद्र
75 – ऐन्द्री – इंद्र , कौशिक
80- सहस्त्रचंद्रदर्शन- सहस्त्र संख्या
गुणविशिष्ट चंद्र
85 – रौद्री- मृत्युंजय , रुद्र
90 – कालस्वरूप सौरी- कालस्वरूप सूर्य
95 – त्र्यंबक महारथी- मृत्युंजय रूद्र
100 – शताब्दी महामृत्युंजय- महामृत्युंजय
No Comments
Sorry, the comment form is closed at this time.