संस्कार

गर्भाधान :

देश काल यांचे उच्चारण करून संस्कार कर्त्याने संकल्प करावा की, माझ्या भार्येच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या सर्व गर्भाचे बीज व गर्भापासून उत्पन्न होणारे सर्व पाप दूर होऊन परमेश्वराची प्रीती व्हावी यासाठी गर्भाधानाचा संस्कार करतो ।

त्यानंतर पुन्हा संकल्प करावा की,  त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करतो।  हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। नंतर गर्भाधानाचे अंगभूत दहा ब्राह्मणांचे भोजनाचा संकल्प करावा अथवा प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन करावे।

गर्भाधान संस्कार न केल्यास अथवा चुकून करायचा राहिल्यास प्रयोगपरिजातात आश्वलायन महर्षींनी सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त करावे।  गर्भाधान संस्कार न करता उत्पन्न होणारा प्राणी सदोंष होतो। दोषपरिहारार्थ ब्राह्मणांस एक गाय दान द्यावी व पुंसवन नावाचा पुढील संस्कार करावा।

 

पुंसवन :

देशकालादि संकीर्तन करून आजच्या पुण्यदिवशी माझ्या स्त्रीचे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या गर्भाचे सर्व दोष निरसन होऊन तो गर्भ सर्व प्रकारे प्रजननशक्तीमान होण्यासाठी परमेश्वराच्या प्रीतीस्तव हा संस्कार गर्भ स्पन्दनापूर्वी करावा। त्याचे अंगभूत गणेशपूजन, पुण्याहवाचन , मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप व नांदीश्राद्ध करावे। हे विधी विधिवत जाणकार पुरोहिताकडून करवून घ्यावेत। हा संस्कार दुसऱ्या -तिसऱ्या मासात करावा।  या संस्काराचे पुण्यफळ मिळण्यासाठी दहा ब्राह्मण भोजनाचा संकल्प अथवा प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन करावे।

 

No Comments

Sorry, the comment form is closed at this time.

ऑनलाईन श्री गणेश स्थापना

 

या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी शनिवार  दि २२ ऑगस्ट २०२० रोजी आसून तिथी सायंकाळी ७. ५८ मिनिटापर्यंत असल्याने पार्थिव गणेशाच्या स्थापनेसाठी  मानला जात आहे.